मंगळवार, ५ मे, २००९

‘वाल्मिकी रामायणातील अरण्यकांड’
सोबतीचे एक ज्येष्ठ व व्यासंगी सभासद श्री. प्र.के.फ़डणीस यांनी आजवर रामायणावरील साहित्याचे विपुल वाचन केले आहे. विशेष म्हणजे आपण जे वाचतो त्यावर त्यांचे मननही चालू असते आणि ते मनन श्रोत्यांच्या...नुसते कानापर्यंतच नव्हे, तर मनापर्यंत जावे या हेतूने ते मधून मधून व्याख्य़ानेही देत असतात.
‘वाल्मिकी रामायणातील अरण्य़कांड’ या विषयावर, ‘सोबती’ने दिनांक २२ एप्रिल २००९ रोजी त्यांच्याच भाषणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. श्री. फ़डणीस यांनी भाषणामध्ये आवश्यक त्या ठिकाणी स्थळ-काळाचे संदर्भ देवून अतिशय मुद्देसूदपणाने आपले विचार मांडले.
वनवासात असताना प्रभू रामचंद्र व सीता यांची प्रथम ‘विराध’ नावाच्या दैत्याशी गांठ पडली व तेथपासून पुढे अकरा वर्षेपर्यंत अनेक स्थळांना भेटी देत देत, रिषीमुनींच्या भेटी घेत घेत ते ‘पंचवटी’ या ठिकाणी आले. त्या काळी ‘खर’ आणि ‘दूषण’या दैत्यांची जेथे अनिर्बंध सत्ता होती त्या पंचवटीतच राक्षसकन्या शूर्पणखेचे नाक कापण्याचा प्रसंग घडलेला आहे.
वास्तविक प्रभू रामचन्द्रांजवळ तपःप्रभाव, शस्त्रप्रभाव असूनही त्यांनी केवळ शूर्पणखेलाच लक्ष्य बनविले खरे, परंतू त्या कॄत्यामागे केवळ तेथील प्रस्थापित राक्षसी सत्तेला आव्हान देण्य़ाचाच त्यांचा हेतू होता व तो तात्काळ सफ़लही झाला ! कारण त्याचाच परिणाम म्हणून पुढे रावणाने, ‘शूर्पणखेची मानहानी’ हा समस्त दैत्यकुळाचा अपमान समजून त्याचा बदला घेण्य़ासाठी म्हणून सीतेचे अपहरण केले..!
वास्तविक रावण हा सुद्धा थोर तपस्वी, पुण्यबल होता. पुण्याचं कवच होतं त्याच्याभोवती ! सीतेविषयी त्याच्या मनात बेलगाम वासनाविकारही नसावा असे दिसते. कारण त्याच वेळी सीतेशी असभ्य वर्तन करणॆ सहजशक्य असूनही, तसे काहींही न करता त्याने केवळ तिचे अपहरण करून तिला लंकेमध्ये नेवून ठेवले! अर्थात रामांबरोबर युद्ध करण्याची वेळ आलीच तर त्यावेळी युद्धभूमीसुद्धा आपल्या खास परिचयाची असावी, जेणॆकरून युद्ध जिंकणे सहज शक्य होईल या कूटनीतीनेच त्याने सीतेला लंकेमध्ये नेले असावे, असा एक तर्कसंगत व अभ्यासपूर्ण द्रष्टीकोन श्री. फ़डणीस यांनी मांडला व तो खरोखरच श्रोत्यांना नव्याने विचार करायला लावणारा होता.
सुमारे सव्वा तासाच्या भाषणानंतर, श्री. फ़डणीस यांनी श्रोत्यांच्या विविध प्रश्नांना समर्पक उत्तरे दिल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

सोमवार, ४ मे, २००९

शनिवार, १८ एप्रिल, २००९

holi aayee re..rang laayee re...

होली आयी रे..रंग लायी रे...
मंगळवार दि.१० मार्च’०९ रोजी "लोकमान्य सेवा संघ" आणि "सोबती ज्येष्ठ नागरिक संघटना" यांच्या संयुक्त विद्यमाने लो.से. संघाच्या गोखले सभागृहात श्रीमती शुभदा मराठे यांच्या गायनाचा दर्जेदार कार्यक्रम झाला.
सर्वप्रथम सोबतीच्या कार्यवाह श्रीमती सुनीता कुलकर्णी यांनी कलावंतांचा परिचय करून दिल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली.
श्रीमती शुभदा मराठे यांनी सुरुवातीला ४५ मिनिटे आपल्या सुमधूर व स्वच्छ आवाजात "श्री" राग आळविला. त्यानंतर त्यांनी मोकळ्या आवाजात सादर केलेल्या "सोहोनी" रागामधील "रंग ना डालो श्यामजी" या ठुमरीने कार्यक्रमात रंग भरायला सुरुवात झाली. होरी, झूला, भजने आणि होळीगीते अशा विविध गायनी कळांनी कार्यक्रम उत्तरोत्तर रंगतच गेला. "जो भजे हरीको सदा" या पंडीतजींच्या सुप्रसिद्ध भैरवीने सुमारे अडीच तास रंगलेल्या या कार्यक्रमाची सांगता झाली.
श्रीमती शुभदा मराठे यांना श्री. विलास खरगोणकर यांनी तबल्यावर उत्तम साथ केली तर पार्ल्यातीलच एक ख्यातनाम कलाकार श्री. दत्ता जोगदंडे यांच्या संवादिनीवरील साथीमुळॆ कार्यक्रम अत्यंत श्रवणीय झाला.
-----------------------------------------------------------------------------------------------------